in ,

मुख्यमंत्री लॉकडाउनबाबत आजच मोठा निर्णय घेतील – अस्लम शेख

कोरोना साखळी तोडायची आहे. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेली नाही. कुंभमेळ्यामुळे कोरोना विस्फोट होऊ शकतो. लोकांच्या सहकार्याने कोरोना साखळी तोडू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाउनबाबत निर्णय घेतील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. शेख यांच्या वक्तव्यामुळे लॉकडाउन लागण्याची शक्यता वाढली आहे किंबहुना लॉकडाउनबाबत आता कधीही घोषणा होऊ शकते.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्यातील लॉकडाउनसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउनसंदर्भात आजच मोठा निर्णय घेऊ शकतात, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लॉकडाउनबाबत चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांचं वक्तव्य महत्त्वाचं आहे. बाहेरून मुंबईत येणाऱ्यांवर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे, असंही शेख म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स तसंच सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री लॉकडाउनसंदर्भात विचार करत आहेत. त्यामुळे अस्लम शेख यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

भाजपालाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस; देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पाऊस आणि वादळ