in

वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेताल. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्विट करत वैद्यकीय परीक्षांचा मुद्दा मांडत चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी अमित देशमुख यांना योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं.

“राज्यभरात कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत. परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक कोरोनाग्रस्त आहेत. याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत. जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीची मुलासह आत्महत्या

Gold Price Today | आज किती महाग झाले आहे सोन्या-चांदीचे दर, ते येथे तपासा