in ,

Maharashtra Corona; महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक माहिती आहे. आज १५ हजार २२९ जणांना कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.७३ टक्के एवढं झालं आहे.

राज्यात एका दिवसात ३०७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय करोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भाभीजी घर पे है’ फेम अभिनेत्रीने बनावट ओळखपत्र दाखवून घेतली लस

भाजप नेता गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; औषध साठ्याचा आरोप सिद्ध