in

कोण आहे? चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरची प्रेयसी!

टी २० लीगच्या २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा सहज फडशा पाडत विजय मिळवला. पंजाबचा कप्तान केएल राहुलने ९८ धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. मात्र यावेळी प्रेक्षकांचे मन जिंकले ते चेन्नईचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याने आपल्या प्रेयसीला प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रपोज केले.

या हटके प्रपोजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे त्याचबरोबर सर्वाना प्रश्न पडला आहे तो दीपकची ही प्रेयसी नक्की कोण? तिच्या बद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता लागली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.

सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले. दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंड खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला.दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे. पण दीपकची ही प्रेयसी नक्की कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज असे आहे. जया ही प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ बिग बॉस आणि एमटीव्हीवरील प्रसिद्ध स्प्लिट व्हिला या शोमध्ये झळकला होता.

जया आणि दीपक गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. यंदाच्या अनेक सामन्यात ती स्टँड्समध्ये बसून सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाली. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.ती सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते. ती मूळची दिल्लीची असल्याचे बोललं जात आहे.

सध्या ती दीपकला सामन्यादरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला गेली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान दीपक आणि जया टी २० लीग च्या सामन्या नंतर घरी परतताच लग्न करू शकतात, असे बोललं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीक्षेत्र झुंज येथील दुर्घटनाग्रस्त यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले