in

ममतांनी बंगाल जिंकलं, मात्र नंदीग्रामचा ‘अधिकारी’ कोण ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे. मात्र नंदीग्रामचा निकाल अद्याप समोर आला नाही आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला आहे की पराभव यावरुन चर्चा सुरु असताना तृणमूलने अद्याप मतमोजणी सुुरु असून कोणतेही अंदाज व्यक्त करु नका असं आवाहन केलं आहे.

भाजपच्या शुभेंदू अधिकारी नंदीग्राममधून विजय झाले असल्याची माहिती आहे. 1953 मतांनी पराभव ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत होती.नंतर ममता बॅनर्जीं विजयी होतील अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र अखेर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी जोरदार मुसंडी मारत 1953 मतांनी ममता बॅनर्जी यांचा प्रभाव केला.

पश्चिम बंगालमधील विजयावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, भाजपाचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं. आम्ही निवडणूक आयोगाकडून खूप त्रास सहन केला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. नंदीग्रामबद्दल चिंता करु नका, आम्ही एक लढा दिल्याने मला तिथे जास्त संघर्ष करावा लागला. तेथील लोक जो कौल देतील तो मला मान्य आहे. आम्ही २२१ हून जास्त जागा जिंकल्या असून भाजपाचा पराभव झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ममता बॅनर्जींच्या विजयानंतर ‘या’ व्यक्तीचा राजकारणाला रामराम

Pandharpur Election Results | ”मी करेक्ट कार्यक्रम करतो”; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…