in

DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकातावर ७ गडी राखून विजय

दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर ७ गडी राखून विजय नोंदवला.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्लीकडून पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीला ६ चौकार ठोकले. पृथ्वीव्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. दिल्लीने १६.३ षटकातच हा विजय साकारला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गजा मारणेच्या टोळीशी संबंध; १४ जण अटकेत

#HappyBirthdayRohit | हिटमॅनच्या पत्नीनं दिल्या खास शुभेच्छा..