in

Delhi Weekend Curfew | दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. दिल्लीमध्ये सध्या स्थितीत ५००० पेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत , यावेळी आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्रातील तुरूंगातही कोरोनाचं थैमान