in

budget session | सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 7 वा दिवस असून विधानसभेचा आजचा दिवस गाजणार आहे. यावेळी विरोधी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

JEE Main Result 2021: मुंबईचा सिद्धांत जेईईत अव्वल

खडसें सहकार्य करत असतील तर अटक करण्याची काय गरज? हायकोर्टाचा ईडीला सवाल