in

दि पीपल्स फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मंगेश जोशी | महाराष्ट्रातील महिलांचे बचत गट मायक्रो फायनान्स कर्ज केंद्र सरकारने माफ करावे. यासाठी दि पीपल्स फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने गायत्री सोनवणे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गायत्री सोनवणे यांनी दिला आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातांचे कामे गेले त्यामुळे बचत गटातून महिलांनी रोजगारासाठी घेतलेले कर्ज भरणे शक्य होत नाही. त्यामुळे कर्जाच्या मानसिक तणावामुळे महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बचत गटाचे प्रतिनिधी वारंवार महिलांच्या घरी येतात आणि दोन ते तीन तास बसून राहतात ‘तुम्ही कुठूनही पैशाची व्यवस्था करा मात्र आमचे हप्ते तुम्ही भरा’ लोन घेताना तुम्हाला लाज वाटली नाही का? अशा शब्दात परिवारातील लहान मुल सासू-सासरे यांच्या समोर महिलांना अपमानस्पद बोलतात. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महिला बचत गटाचे कर्ज माफ करून महिलांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गायत्री सोनवणे यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात २ हजार ३८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गडचिरोलीत सापडले बिबट्याचे बछडे, स्थानिकांनी काढले सेल्फी