in

“हा काय हलकटपणा लावला”…आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा तोल सुटला!

अमरावती नियोजन भवन कार्यालयातील एसी काढल्यावरून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंकेचे व जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यात वाद पेटला आहे. या वादाची व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन्हीही उच्चपदस्थ अधिकारी एकमेकांसोबत असंसदीय भाषेत बोलताना दिसत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन हे रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या अंतर्गत आहे. या कार्यालयातून बुधवारी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी वातानुकूलित यंत्र काढून नेत असल्याच्या मुद्यावरून वाद झाला. अखेर हा वाद एवढा विकोपाला गेला की, उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी “हा काय हलकटपणा लावला”, असा उल्लेख केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतात आतापर्यंत ४० कोटी लोकांना लस, केंद्राने जारी केली आकडेवारी

पुण्यात प्रियकरासह मित्राला मारहाण… दोघांचा मृत्यू!