in

Deva O Deva | बाप्पा पावले! देवा ओ देवा भक्तीसंगीताने रचला विक्रम

गणेशोत्सवानिमित्त रीलीज करण्यात आलेल्या सनशाईन म्युझिकच्या देवा ओ देवा या भक्तीसंगीताला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. देवा ओ देवा या गाण्याला रीलीजच्या 7 दिवसांत युट्युबवर 9 लाख व्ह्यूज मिळवले आहेत. या व्ह्यूजमुळे या गाण्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

सनशाईन म्युझिकने देवा ओ देवा या भक्तीसंगीताची निर्मीती केली आहे. हे गाणे गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी उत्कृष्टरीत्या गायले आहे. तर भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सौरभ राज जैन (Saurabh Raj Jain) या गाण्यात गणपती बाप्पाच्या भक्ताची भूमिका निभावली आहे. तर सौरभ सोबत चाइल्ड आर्टिस्ट शिवांजलि पोरजे (Shivanjali Porje) मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक व्यास लिखित हे गाण असून राजीव रूहिया यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे तर राजू सरदार यांनी संगीतबद्ध केले आहे.

”देवा ओ देवा” हा म्युझिक व्हीडिओने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. देवा ओ देवा भक्तीसंगीताला रीलीजच्या 7 दिवसांत 9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या संगीताने नवीन विक्रम केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दूरसंचार क्षेत्रात आता १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक

Jalyukat Shivar Yojana | भाजपच्या अडचणी वाढणार? जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू