in

Pegasus Spyware | “पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र”

मागील काही दिवसांपासून देशात पेगॅसस प्रकरणाची चर्चा रंगली आहे. दिल्लीत सुरू झालेल्या अधिवेशात देखील फोन टॅपींग प्रकरण चांगलंच तापलं. विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून मोदी सरकारडे स्पष्टीकरणाची मागणी केली. या प्रकरणावर राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेत खुलासा केला.

“सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालं. ते डिरेल करण्याचा प्रयत्न विरोध पक्षाकडून होतोय. हे अधिवेशन डिरेल करण्यासाठी रणनीती करून, कपोलकल्पित बातम्या पेरून अधिनेशनाच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.

काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी दिली आहे. पण या बातमीला कोणताही आधार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की आपली कोणतीही एजन्सी अशा प्रकारचं बेकायदा कृत्य करत नाही.

आपल्याकडच्या टेलिग्राफ कायद्याने मोठ्या प्रमाणावर कठोर नियम केले आहेत. एनएसओ या पेगॅसस तयार करणाऱ्या कंपनीने देखील अशा प्रकारच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यांनी या मीडिया हाऊसला देखील निराधार यादी प्रकाशित केल्याची नोटीस बजावली आहे”, असं ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Adani समुहाकडून मुंबई विमानतळ टेकओव्हर, जाणून घ्या अहमदाबाला कार्यालय हलवण्याचं कारण

दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला