in

देवेंद्र फडणवीस LIVE | गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले असून या प्रकरणात गुंतलेल्या मोठ्या हस्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांमुळे सर्वांचेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • हे सर्व प्रकरण धक्कादायक आहे
  • सुबोध जैस्वाल यांनीही असेच आरोप केले होते
  • सुबोध जैस्वाल यांच्या रिपोर्टवर कारवाई केली नाही , साधी चौकशी देखील केली नाही
  • पोलीस बदल्यांचे एक रॅकेट आहे
  • बदल्यांच्या रॅकेटमधून सतत गृहमंत्र्यांचे नाव समोर येत आहे.
  • शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकून आश्चर्य वाटले
  • शरद पवारांना आपलं सरकार वाचवायचं आहे
  • शरद पवार जे सांगतात ते अर्धसत्य आहे
  • परमबीर सिंह यांच्या पत्रात सर्वानाच उल्लेख
  • गृहखाते आता कोण चालवत आहे ? अनिल देशमुख की अनिल परब फडणवीसांचा सरकारला सवाल
  • गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा
  • ‘त्या’ गाड्या ६ महिन्यात कोण वापरात होत ? याची चौकशी व्हावी
  • कोणती मोठी लोकत्या गाड्या चालवत होती ? याची चौकशी व्हावी
  • गृहमंत्री राजीनामा देत नाही ते पर्यत भाजपचे आंदोलन सुरूच राहणार
  • रश्मी शुक्ला समिती नंतर चौकशी झाली असती तर ही वेळ आली नसती
  • उपमुख्यमंत्री या प्रकरणावर का बोलत नाही ?
  • शरद पवार सत्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत
  • पवारांना दोष देणार नाही, ते सरकारचे निर्माते
  • जैस्वाल राज्य सोडून केंद्रात गेले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साप्ताहिक राशी भविष्य 22 मार्च ते 28 मार्च 2021

“शरद पवारांना आपलं सरकार वाचवायचंय”