in ,

शिवसेना आता बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणविसांची शिवसेनेवर सडकून टीका

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. ही शिवसेना आता बाळासाहेबांची राहिली नसल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी हिंडीलगा येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर छापत आहे. यामध्ये बाळासाहेबांचं नाव जनाब असे लिहले जाते. महाराष्ट्रात शिवसेना आता टिपू सुलतान जयंती साजरी करत आहे. म्हणूनच जी काँग्रेस टिपू सुलतान यांची जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरिता शिवसेनेचे नेते बेळगावता आले असल्याचा टोला हि फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

भाजप मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द असल्याच्या विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मराठी माणसाला मुंबईत बेड मिळत नसल्याने तो मरतो आहे त्याची चिंता का करीत नाही ,? त्यांचे प्रेम बेगडी असल्याचा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना केला आहे.

तिरंगी लढत

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी मागे घेत महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणेकरांना दिलासा ! ससूनमध्ये आणखी 300 बेड्सची क्षमता वाढणार

‘कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र