in

४५ वर्षांपेक्षा कमी असूनही देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला देण्यात आली लस ; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

देशात एकीकडे करोना संसर्ग वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे सर्व सामान्यांना आरोग्य सुविधा मिळवण्यात अडचणींना सामोरं जाव लागत आहे. राज्यात सर्वत्र आरोग्य सेवांचा तुटवडा असताना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या देशात ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सरू आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असूनही त्याने दुसऱ्यांदा लस टोचवून घेतल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या फडणवीसांवर जोरादार सोशल मीडियावर निशाणा साधला जात आहे.

”देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का? जर नाही तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला? रेमडेसिवीरप्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लस तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत, मात्र फडणवीस कुटुंब सुरक्षित आहे.” असं एकाने म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन प्लांट उभारणार राज्य सरकारचा निर्णय

प्रियांका मोहिते : अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला