in ,

…तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

गोपीनाथ मुंडे यांना लोकनेता म्हटलं जातं. ते जननायक आणि लोकनायक बनले. नाथ्रासारख्या छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या आठवणी जागवल्या.

भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट Postal Envelope चं अनावरण करण्यात आलं. या निमित्त बोलताना त्यांनी वरील विधान केले.

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं”

Maharashtra Unlock; राज्य 5 टप्प्यात अनलॉक होणार, मंत्री विजय वड्डेटीवार मोठे विधान