in ,

Anil Deshmukh Resigns: “या प्रकरणात मुख्यमंत्र्याचे मौन अस्वस्थ करणारे”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या पदाच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. महिनाभरापासून गंभीर आरोप होत असून देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मौन बाळगणे ही बाब अस्वस्थ करणारी आहे, असे फडणवीस म्हणाले.

नैतिकतेच्या आधारावर याआधीच राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र, सरकारने उशीर केला. या संपूर्ण प्रकरणातील आणखी काही हॅन्डलर्स समोर येतील, असे देखील फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. संजय राऊत यांची परिस्थिती म्हणजे “सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी आहे,” असे फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांच्या भेटीनंतर राजीनामा द्यायचे ठरले – नबाव मलिक

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत