in

‘देवमाणुस’ मालिका वादाच्या भोवऱ्यात

अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली ‘देवमाणूस’ ही मालिका
आहे. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अश्या वृत्ती विषयी भाष्य करणारया देवमाणूस मालिकेच्या पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होत आणि खूप कमी वेळेतच प्रेक्षकांची या मालिकेला पसंती मिळाली पण आता मात्र ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही मालिका सोशल मिडियावर कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते मालिकेत सरू आजी हे पात्र तिच्या म्हणींमुळे लोकप्रिय झालं, पण आता त्यातील एका म्हणीमुळे ही मालिका वादात सापडली आहे

१३ जुलै रोजी देवमाणूस या मालीकेचा एक भाग प्रदर्शित झाला होता, या भागात सरुआजी ‘आपलीच मोरी अन अंघोळीला चोरी या आशयाची म्हण एक दृश्यात बोलताना दिसल्या, त्यांनतर सोशल मिडिया वर एक व्हिडिओ व्हायरल झाला, या व्हायरल व्हिडिओमध्ये आपलीच मोरी अन …चोरी या संवादात एक अश्लील शब्दाचा वापर केला गेला असल्याचे प्रेक्षक आणि नेटकरी यांनी म्हटले आहे.

या व्हीडीओवरुन नेटकऱ्यांनी टीका केल्याचे कळताच झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणाले यांनी स्पष्टीकरण दिले की, “हा कोणीतरी खोडसरपना केला आहे, वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, एक जबाबदार वाहिनी म्हणून आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील शब्द किंवा संवादाचा वापर केला नाही. संवादात अपशब्द येऊ नये, हे तपासण्यासाठी आमची एक वेगळी टीम काम करत असते, आमचे कलाकार अशाप्रकारचा संवाद मुळात स्वत: बोलणारच नाहीत, त्यामुळे सोशल मिडियावर जे बोललं जात आहे ते चुकीच आहे”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक रिलीज

Ashadhi Wari | ”मी नसलो तर मुख्यमंत्र्यांची पूजा यशस्वी होणार नाही”