in

कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी; कोरोना नियमांचं उल्लंघन

सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनासंबंधी नियमावली केंद्रासह प्रत्येक राज्यानं जारी केली आहे. असं असतानाही हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. कोरोना कहर वाढत असताना लोकांनी कोरोना नियमांचं जाहीरपणे उल्लंघन केलं आहे. यावेळी सामाजिक अंतरासह मास्क कोणीही वापरलं नाही.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येनं भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. हरिद्वारला येताना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणं अनिवार्य करण्यात आलं होतं. १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांच ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

WHO प्रमुखांनी लस वितरणाबाबत व्यक्त केली ‘ही’ चिंता

Farmers Protest | दिल्ली सीमेवर रिकामे टेंट उरले; आंदोलक शेतकरी फिरले माघारी