in

तिरुपती मंदिरात भक्ताने अर्पण केली पाच किलो सोन्याची तलवार

श्रद्धेपोटीच भाविक आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या देवाला मनोभावे प्रार्थना करतात आणि काहीवेळी नवस करतात. तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात प्रसिद्ध श्रीमंत मंदिरांपैकी एक असून असे देखील सांगितले जाते की, हा देव सर्व इच्छांची पूर्ती करतो. हैदराबादमधील एका व्यावसायिकाने सोमवारी भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात एक कोटी रुपये किंमत असणारी सोन्याची ‘सूर्य कटारी’ म्हणजेच तलवार बालाजीच्या चरणी अर्पण केली आहे.

तिरुमाला तिरुपति देवस्थानम (टीटीडी) अधिकाऱ्यांने सांगितलेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या तलवारीचे वजन पाच किलो आहे. ज्यामध्ये दोन किलो सोने आणि तीन किलो चांदी वापरण्यात आली आहे. तिरुपती बालाजी मंदिरात भक्त फक्त पैसे किंवा सोनंच अर्पण करत नाही तर आपले केस अपर्ण करतात. तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगररांगाना शेषनागाचे सात फण मानले जातात. त्यामुळेच या डोंगररांगाना सप्तगिरी असं म्हटलं जातं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी

Prajakta Mali | प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला