in

SACHIN VAZE ISSUE : महासंचालक परमबीरसिंह यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… 100 कोटींच्या वसुलीचे वाझेंना टार्गेट

होमगार्ड्सचे पोलीस महासंचालक परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये सचिन वाझे प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा झाला आहे. परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. सचिन वाझे यांच्यावर गृहमंत्र्यांनी १०० कोटींची वसुली करण्याची जबाबदारी दिली होती, असा आरोप करण्यात आला आहे.

सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावले होते. यावेळी मुंबईत सुरू असणाऱ्या हॉटेल्स-बार तसेच हुक्का पार्लर्स संदर्भात चर्चा झाली. मुंबईतून १०० कोटींची वसूली व्हावी यासाठी गृहमंत्र्यांनी जोर लावला होता. यावर बोलताना, मुंबईत जवळपास १ हजार ७२५ हॉटेल्स असून प्रत्येकाकडून महिन्याला २-३ लाखांचे हफ्ते घेतल्यास ४० ते ५० कोटींची वसूली होईल, असे वाझे म्हणाले. यानंतर उर्वरित रक्कम अन्य स्रोतांमधून गोळा करू, असे देशमुख म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चले तो चाँद तक… : चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह

एका स्त्रीच्या पराभवासाठी संपूर्ण सत्तेचा वापर, पश्चिम बंगालवरून शिवेसनेची भाजपावर टीका