in

मुंडे भावा बहिणीत रंगला ट्विटरवॉर; तुम्हाला हक्क आहेच भाऊ !

बीडमध्ये एकीकडे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे पंकजा मुंडे आणि सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यात ट्विटरवॉर रंगला आहे.

“राज्याच्या भल्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन. त्याची दखलही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा,” असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असेही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या आहेत.

वादाची सुरुवात

बीडमध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत असल्याने पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे व्हॅक्सीन मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. या ट्वीटनंतरच ट्विटरवॉर सुरु झाला.

यानंतर धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे टीका केली होती. ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट करून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना चिमटा काढला.

तसेच धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात झालेल्या आकडेवारीचाच लेखाजोखा मांडला. जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 1 लाख 49 हजार 473 नागरीकांना पहिले तर 19 ह्जार 732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती आपल्याला असेलच असेहि त्यांनी केले. तसेच राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

“अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 CSK vs PKBS | आज चेन्नई सुपर किंग्ज ची पंजाब किंग्जशी लढत

”राज्यात ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार”…अखेर मंत्र्यांचीच ग्वाही