in

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध धोनीची दमदार खेळी

धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार खेळी करून सध्या चर्चेचा विषय बनला आहे.आयपीएल २०२१च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ चेंडूंत धोनीने चांगलाच खेळ दाखवला.दिल्लीचा पराभव करून आयपीएल २०२१ ची अंतिम फेरी गाठली आहे.

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यात धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता ३००. आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीची ही आतापर्यंतची सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेली खेळी ठरली आहे.

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर धोनी आयपीएलचा १०वा अंतिम सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून १ अंतिम सामना खेळलेला आहे. यासह, महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक ९ वेळा कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा धोनी पहिला कर्णधार ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने; भुसावळमध्ये राडा

सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा झटका; हाय व्होलटेजमुळे शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक