in ,

VIDEO | धर्मेंद्र यांची पहिली कार पाहिलीत का?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीपासून लांब असले तरी धर्मेंद्र हे सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. धर्मेंद्र हे नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना जुने फोटो पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ही गाडी किती रुपयांना खरेदी केली? आणि आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीबद्दलचे काही किस्से सांगितले. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये पहिली फिएट कार खरेदी केली असून ही गाडी त्यांनी त्यावेळी १८ हजार रुपयांना खरेदी केली होती. “मित्रांनो ही फिएट गाडी माझ्या आयुष्यातील पहिली गाडी आहे. ही गाडी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.एका संघर्षशील तरुणासाठी देवाचा मोठा आशीर्वाद आहे ,” असे धर्मेंद्र यांनी या गाडीबद्दल म्हटले.

धर्मेंद्र त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात शूटींगसाठी सायकलने ये-जा करायचे. मात्र जेव्हा ते एक प्रसिद्ध कलाकार बनले तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना गाडी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी ही फिएट गाडी खरेदी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही”

… म्हणून खुर्चीत श्वान बसवून ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन