in

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची रुग्णालयातून सुखरूप वापसी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळाला आहे. श्वसनाचा त्रास बळावू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असता आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरून हि माहिती देण्यात आली आहे याचसोबत सायरा बानो यांनी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना व प्रेमासाठी आभार मानले आहेत. ‘आम्ही खूप खूश आहोत. दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून फ्लुईड काढण्यात आले आहे. आता आम्ही घरी जात आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी मी सर्वांना धन्यवाद देते.’ अशा शब्दात त्यांनी ट्विट केले आहे.


बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देत घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सर्व चाहत्यांचे व त्यांच्या शुभचिंतकांचे मनापासून आभार मानले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते

दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन आरोपींनी व्हिडीओ केला व्हायरल