in

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, ‘अफवांवर विश्वास ठेऊ नका’

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत अचानक बिघडल्याने  रविवारी सकाळी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले होते. याचवेळी दिलीप कुमार यांचा मृत्यू झाला असल्याची अफवा व्हट्सअॅपवर पसरली.

बातमी खंरी आहे का खोटी याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळवलं त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता दूर झालीये.  

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Heavy Traffic | अनलॅाक होताच मुंबईकर घराबाहेर…

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात चिपळूणमध्ये काँग्रेसचे आंदोलन