in ,

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्याजागी नवे गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने हि माहिती दिली.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला आहेत. तर त्यांच्याकडील कामगार विभागाचे शुल्क हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे. तर अतिरिक्त उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने संमती दिली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते जयंत पाटील की दिलीप वळसे पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यापैकी कोणाकडे जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत, अखेर आता गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे.

अनिल देशमुख यांची उचलबांगडी होण्यासाठी सर्वात मोठं कारण म्हणजे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात परमबीर सिंगांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या गंभीर आरोपामुळे देशमुखांचा पाय खोलात आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला- संजय राठोड

Deepali Chavan suicide case; बेलदार समाज रस्त्यावर उतरणार