in

Dilwale Dulhania Le Jayenge २६ वर्षांनंतर नव्या रुपात येणार भेटीला!

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राचा रेकॉर्ड ब्रेक करणारा ब्लॉकबास्टर सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( DDLJ) २६ वर्षांनंतर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शक म्हणून ब्रॉडवेमध्ये पदार्पण करणार आहे.

१९९५ नंतर राज आणि सिमरनची लव्हस्टोरी ब्रॉडवे संगीताच्या रुपात क्रॉनिक केले जाणार आहे. आदित्य चोप्राने शनिवारी घोषणा करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. या प्रोजेक्टवर आदित्य चोप्रा मागील ३ वर्षांपासून काम करत आहेत.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील राज आणि सिमरनची लव्हस्टोरी एका संगीतमय नाटक म्हणजेच ब्रॉडवेच्या माध्यमातून रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. कम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकलचा प्रीमियर अमेरिकेतील सैन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये होणार आहे.

कम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकल २०२२-२०२३मध्ये ब्रॉडवे सीझनमध्ये स्टेजवर सादर केले जाणार आहे. ज्याचा वर्ल्ड प्रीमियर सॅन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये सप्टेंबर २०२२ दरम्यान होणार आहे.
आदित्य चोप्राचे म्हणणे आहे की, म्युझिकल ब्रॉडवे भारतीय चित्रपटांसारखेच आहे. हे कित्येक वर्षांपासून दुरावलेल्या दोन प्रेमी आहेत, जे पहिल्यांदा ब्रॉडवे शो कम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकलमध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold and Silver Rate Today | आजचे सोन्याचांदीचे दर

सैफ-राणी पुन्हा झळकणार एकत्र; ‘बंटी और बबली २’चा टिझर रिलीज