in

मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड

मंगळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो नुकताच नासामध्ये काम करणाऱ्या केविन गिल यांनी शेअर केला आहे. केविन गिल यांच्यासह जेसोन मेजर यांनी देखील काही फोटो शेअर केले आहेत.

केविन गिल हे नासामध्ये कार्यरत आहेत. नासाच्या मंगळ ग्रहावरील अ‌ॅडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं मगंळ ग्रहावरील पाठवेला फोटो ट्विटरला शेअर केला आहे. हा फोटो रोव्हरनं 15 एप्रिलला नासाकडे पाठवला. केविन गिल यांनी हा फोटो शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मंगळ ग्रहावरील या दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.

नासाला मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाले आहेत. नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात. Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास केला गेला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गरीब होतकरू मराठा युवांना नोकरी ‘विनामूल्य’ देण्याचे जाहीर करावे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्याची तयारी करा!