in

राजीनाम्याची जोरदार चर्चा; पण गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटक प्रकरणानंतर सुरु झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू व सचिन वाझे या दोन्ही प्रकरणावर विरोधकांनी रान उठवले होते. सत्ताधारी महाविकास आघाडीला यानिमित्त कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाच्या तापासावर अनेक प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला टार्गेट केले होते. तसेच याच प्रकरणात सचिन वाझे यांना सुद्धा कोठडी सुनावली होती. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनातला व्यक्ती यात असल्याचा समोर आल्याने विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनाम्याची मागणी उचलून धरली. प्रसिद्धी माध्यमांमध्येहि या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून झळकत होत्या.

अखेर या प्रकरणावर अनिल देशमुख यांनी ट्विटवरून स्पष्टीकरण दिले आहे.माझा राजीनाम्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे आणि मनसुख प्रकरणात सुरु असलेल्या तपासावर चर्चा झाली. तसेच प्रसिद्धी माध्यमांत माझ्या राजीनाम्याची ज्या बातम्या झळकत त्या निराधार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Amruta Fadnavis | व्यवहार माझे, जबाबदार वाझे, म्हणतं अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

बाबा रामदेव यांना पुन्हा दणका : कोरोनावरील उपचार करण्यासाठी कोरोनीलला परवानगीच नाही