in

बदल्यांबद्दल पोलिसांमध्ये नाराजी कायम , आता ‘या’ अधिकाऱ्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

मनसुख हिरेनच्या मृत्यूनंतर राज्याचे राजकारण तापून निघाले आहे. याच प्रकरणात परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. पोलिस महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. तर, रजनीश सेठ यांना नगराळेंच्या जागेवर पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. यावरून आयपीएस संजय पांडे नाराज आहेत. त्यामुळे ते मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ते बुधवारपर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयमध्ये याचिका दाखल करणार आहेत.

रजनीश शेठ हे संजय पांडेंचे ज्युनियर आहेत. तरीही रजनीश यांना पोलीस महासंचालकपदी नेमण्यात आले. यासंदर्भात पांडेंनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पांडेंना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीचा कार्यभार न स्वीकारता त्यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागणार आहेत.

कोण आहेत संजय पांडे ? – संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी आयआयटी कानपुर येथून त्यांचे शिक्षण झाले. १९९३ साली झालेल्या झालेल्या दंगलीच्या वेळी संजय पांडे जास्त चर्चेत आले होते. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाजेष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

दरम्यान, परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हटवून गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप लावले आहेत. महिन्याला मुंबईतील हुक्का पार्लर व बियर बारकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश त्यांनी सचिन वाझेंना दिले होते, असे गंभीर आरोप त्यांनी देशमुखांवर केले आहेत. त्यानंतर मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. यासर्व प्रकरणावरून पोलीस अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यानामुळे राज्यसरकार विरुद्ध पोलीसदलात नाराजी आहे ही गोष्ट स्पष्ट होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनिल देशमुख मुंबईतच क्वारंटाइन होते; नवाब मलिक यांचा दावा

लॉकडाउन शेवटचाच पर्याय!; राजेश टोपे