in

तळेगाव ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरण अंगलट

ठाणेदारासह १२ पोलिसांची १ वर्ष वेतनवाढ रोखण्याची नोटीस

सूरज दाहाट
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी डीजे वाजवला होता. ही बाब समोर येताच तडकाफडकी पोलिस अधीक्षकांनी ठाणेदारांची नियंत्रण कक्षात बदली केली होती. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी एसडीपीओंकडे सोपवली होती. दरम्यान या चौकशीत ठाण्यातील १२ पोलिसांचा डीजे प्रकरणात सहभाग आढळल्यामुळे ठाणेदारांसह १२ पोलिसांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. मात्र ठाणेदार आकरे डीजे वाजला त्यादिवशी ठाण्यात हजर नसून कार्यालयीन कामानिमित्त अमरावतीत होते. त्यामुळे त्यांना तळेगावला ठाणेदार म्हणून परत पाठवले आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, कुठेही विसर्जन मिरवणूक काढू नये, ढोल ताशे किंवा डीजे वाजवू नये, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र असे असतानाही तळेगाव दशासर पोलिसांनीच ठाण्याच्या आवारात गणेश विसर्जनादरम्यान डीजे वाजवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर २२ सप्टेंबरला व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओची दखल घेत तळेगावचे ठाणेदार अजय आकरे यांना त्याच दिवशी नियंत्रण कक्षात बदली दिली होती. तसेच या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याबाबत एसडीपीओ जाधव यांच्याकडे चौकशी सोपवली होती. चांदूर

एपीआय अजय आकरे ठाणेदार म्हणून पूर्ववत
एपीआय अजय आकरे हे मागील सहा महिन्यांपासून तळेगाव दशासर येथे ठाणेदार आहेत. दरम्यान ठाण्यात ज्या दिवशी डीजे वाजवला, त्यादिवशी आकरे हे कार्यालयीन व न्यायालयाच्या कामासाठी अमरावतीला आले होते. तसे चौकशीतही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे समोर आले आहे. म्हणूनच एसपींनी एपीआय आकरे यांना पुन्हा ठाणेदार म्हणून तळेगावला परत पाठवले आहे.

एक वर्ष वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस बजावल्या
“एसडीपीओंच्या चौकशी अहवालाच्या आधारे ठाणेदारासह १२ पोलिसांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस दिली आहे. तसेच ठाणेदार आकरे हे संबंधित दिवशी ठाण्यात हजर नव्हते, ते कार्यालयीन कामासाठी एसपी कार्यालयात आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा ठाणेदार पदावर तळेगावला परत पाठवले आहे.” अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साताऱ्यात भरदिवसा खून

अरुणाचल प्रदेशात घुसखोरी; 200 चीनी सैनिकांना पळवले