in

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत डॉक्टरांचे आज काम बंद आंदोलन

राज्‍य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्‍यास राज्‍यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत १५ एप्रिल रोजी चोवीस तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य करणार नसेल तर नाईलाजास्‍तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्‍ट्रने दिला आहे.

हे कामबंद आंदोलन करताना आम्‍हाला कुठल्‍याही रुग्‍णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्‍याने होणारी हेळसांड पाहूनच हे पाऊल अतिशय नैराश्यातून आम्‍हाला उचलावे लागत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.

शासकीय मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्‍वरूपी करण्यात यावे व त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या त्‍यांच्या मागण्या आहेत. तसेच हे पद मंजूर व कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा शासनावर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही असे संघटनेचे म्‍हणणे आहे. ऑक्‍टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते. तेव्हा शासनाकडून ज्‍यांची दोन वर्षे सेवा झाली आहे त्‍यांना कायमस्‍वरूपी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्‍याबाबत पुढे कोणताही निर्णय झालेला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींवर प्रचार बंदी का नाही; ममतांचा सवाल

‘गर्दी वाढतच राहिली तर परिस्थिती गंभीर होईल’