देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५०४.४ दिवसांवरून २०२.४ दिवसांवर गेला आहे. १ मार्चला हा कालावधी ५०४.४ दिवस होता. मात्र यानंतर मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या सहा राज्यात दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून ते आता ८०.९० टक्क्यांवर गेले आहे.
महाराष्ट्रात सर्वांत अधिक म्हणजे २४,६४५ रुग्ण सापडले असून हे प्रमाण ६०.५३ टक्के आहे. त्या खालोखाल पंजाबमध्ये २२९९ रुग्ण असून गुजरातेत १६४० रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरयाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.
फेब्रुवारी महिन्यात भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती. मंगळवारी ३.४५ लाखांपर्यंत रुग्णसंख्या वाढली असून २४ तासांत उपचाराधीन रुग्णांची संख्या १०,७३१ झाली आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब या राज्यात ७५.१५ टक्के रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात ६२.७१ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १ मार्चला ५०४.४ वरून २३ मार्चला तो २०२.४ दिवस झाला आहे. तर, आतापर्यंत ४.८ कोटी लोकांना लस देण्यात आली.
Comments
Loading…