in

लोणावळ्यात ड्रोन चालकाला अटक

लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करण्याची कल्पना अनेक जोडप्यांच्या मनात येत. त्यामुळे अनेक जण मुंबई पुण्याजवळ असलेल्या लोणावळा या परिसरात शूटिंगसाठी येताना दिसतात. आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात हे ड्रोन शूटिंग केल्याने ड्रोन चालकाला तुरुंगात जाव लागलं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात शूटिंग करण्यास बंदी आहे. कोणत्याही प्रकारच्या शूटिंगसाठी परवानगी घ्यावी लागते. प्री-वेडिंग शूट सुरु असताना तेथील कर्मचाऱ्यांनी लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. मात्र तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाहून ड्रोन चालकाने धूम ठोकली. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी ड्रोन चालकाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटेश तेजस बोपन्ना (२६) असं अटक करण्यात आलेल्या ड्रोन चालकाचे नाव आहे. त्यांची जामीनावर सुटका झाली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल सेनेचे INS शिवाजी हे प्रमुख संरक्षण प्रशिक्षण संस्था असून प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्या ठिकाणी शूटिंग करण्यास बंदी आहे. असे असताना देखील ड्रोन चालक व्यंकटेश हा त्या परिसरात ड्रोनद्वारे प्री-वेडिंग शूट करत होता. त्याच परिसरात एअररफोर्स स्टेशनदेखील आहे. ही बाब INS शिवाजी येथे कार्यरत असलेल्या अलोक मिश्रा यांच्या लक्ष्यात आली. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. तातडीने लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. तर, अलोक मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी ड्रोन चालकाचा शोध घेतला असता गेटच्या जवळच ड्रोनचा वापर करत असल्याचं निदर्शनास आले. मात्र, अधिकारी, कर्मचारी तिथे पोहचेपर्यंत व्यंकटेश पळून गेला. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी शोध घेऊन व्यकंटेशला अटक केली होती.

What do you think?

-9 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ

अभिनेता सोनू सूदने चुकवला २० कोटी रुपयांचा कर