in ,

राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट

राज्यावर सध्या ड्रोन (Drone Attack) हल्ल्याचं सावट आहे. दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रीपोर्टमधून समोर आलेल्या माहितीमधून निर्माण झाली आहे. मात्र याबद्दलची धक्कादाय माहिती अशी की, राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत.

महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी लागणार आहे. ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर स्फोटकं बसवता येतात. याशिवाय, त्यांचा पाठलाग करणेही कठीण आहे. आरोपीने मोबाईल फोन वापरला असेल तर त्याचा आयएमईआय क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोनला ऑपरेट करता येत नाही. अनेकदा संशयित व्यक्ती डार्क नेट वर sympathizer ड्रोन हल्ला, रासायनिक पदार्थाचा हल्ला करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे अधिक्षक यशस्वी यादव यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्रात ९८ लाख नागरिकांची लसीकडे पाठ, एकही डोस घेतला नाही