in

म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी लागणारे औषध केंद्र सरकारकडून

“लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये कोणत्याही राज्याला प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्रानेच त्यांच्या पातळीवर टेंडर काढून ती उपलब्ध करुन द्यावी, त्यासाठी समान धोरण पाहिजे असं ते म्हणाले. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कॅबिनेट कदाचित गुरुवारी चर्चा करतील”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“म्युकर मायकोसिसला नोटिफाइड डिसिज अशी मान्यता आरोग्य विभागानं दिली आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचं निदान झाल्यावर त्याची माहिती कळवावी लागणार असून त्याची नोंद करावी लागेल. म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचं केंद्र सरकारकडून वाटप होतं. रुग्णांच्यासंख्येनुसार त्याचं वाटप होईल. रुग्णांची अचूक संख्या पोर्टलवर द्यावी लागेल त्यानुसार वाटप होईल. याची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीसप्रमुखांना दिल्याचं”, टोपे यांनी सांगितलं.

1 जूनला म्युकर मायकोटिसच्या औषधाचे 60 हजार व्हॉइल्स महाराष्ट्राला उपलब्ध होतील. ग्लोबल टेंडरद्वारे ती मागवली गेली आहेत. म्युकर मायकोसिस पसरू नये यासाठी जनजागृतीचं काम केलं जाणार आहे. मास्क आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केलेल्या दंडाची रक्कम त्यासाठी वापरली जाऊ शकते असंही टोपे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cyclone Yaas | येत्या १२ तासांत ‘यास चक्रीवादळ’ भयंकर रुप धारणार

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती