in

Mucormycosis वर प्रभावी औषधाची वर्ध्यात होणार निर्मिती

भूपेश बारंगे | राज्यात म्युकर मायकोसिसचे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात या आजारावर प्रभावी असणाऱ्या एम्फोटेरिसीन बी इंजेक्शनची निर्मिती आता वर्ध्यात होणार आहे. रेमडीसीविर इंजेक्शन तयार करणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्स संस्थेलाचा एम्फोटेरिसीन बीच्या उत्पादनाची मंजूरी मिळाली आहे.

वर्ध्यातील सेवाग्राम एमआयडीसी मधील जेनेटिक लाईफ सायन्स येथे सध्या रेमडीसीविर इंजेक्शन उत्पादन होते. आता हीच संस्था एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन उत्पास्न करणार आहे. अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ मंजुरी मिळून दिली आहे.

सध्या म्युकर मायकोसिस रुग्णांना एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन 40 ते 50 हजार रुपयात विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे वर्ध्यात आता रेमडीसीविर इंजेक्शन पाठोपाठ एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन उत्पादन करण्यात येणार आहे. अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ मंजुरी मिळून दिली आहे.त्यामुळे आता येत्या 15 दिवसानंतर या इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. दर दिवस 20 हजार इंजेक्शन निर्मिती केली जाईल असे जेनेटिक लाईफ सायन्सचे डॉ महेंद्र क्षीरसागर यांनी Lokशाही न्यूजला सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची गरज”

दिलासादायक ! राज्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त