in

नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली, दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील रणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळली. या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे.

बोलेरो गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. स्थानिकानी मदतकार्यासाठी धाव घेतली आहे. तसेच अपघाताची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे.

या ठिकाणी कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नसल्याने माहिती आणि बचाव कार्यास अडचण येत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य करत आहेत. पोलीस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Video ;पंचगंगा नदीत सापडला अमेरिकेत आढळणारा ‘ॲलिगेटर’ मासा

India vs Sri Lanka Live Score, 1st ODI | श्रीलंकेने भारतासमोर ठेवलं 263 धावांचं लक्ष्य