ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अमली नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आलेला अभिनेता एजाझ खान हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
एनसीबीने बुधवारी एजाझ खानला अटक केली होती. तेव्हापासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, यादरम्यान एजाझ खानची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. काल रात्री या चाचणीचा अहवाल आला. त्यामध्ये एजाझ खानला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाचा तपास करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केला जाणार आहे.
Comments
Loading…