in

शहापूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना पालकमंत्र्यांची भेट; अल्याणी गावातील शंभर घरांचे पुनर्वसन करणार

शहापूर तालुक्यात ही अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला होता पूल, मोऱ्या, संपूर्ण पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाल्या आहेत. तर काही पूल वाहून गेले आहेत. काही गावांमध्ये घरं पाण्याखाली गेली होती. त्याची पाहणी करण्यासाठी नगर विकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर तालुक्याचा दौरा केला. यात भातसा नदीवरील सापगाव पुलाची पाहणी केली.

तर चरिव व अल्याणी याठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक संसार उघड्यावर आले होते. घरांमधील अन्न-धान्य भिजलं असून त्यांना तात्काळ मदत करण्यात आली तसेच अल्यानी गावातील शंभर घरांचे तात्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे-नाशिक महामार्गावर हरभरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात

Maharashtra Corona । नवीन बाधितांपेक्षा दुपटीहून जास्त रूग्ण कोरोनामुक्त