in ,

Election | निवडणुकीच्या राज्यात कोरोनाचं थैमान

दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. अशातच विधानसभा निवडणुकी दरम्यान, सभा, रॅली, रोड शोसाठी लाखोच्या संख्येने लोकं गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसताय, मात्र हेच आता पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पद्दुचेरीला महागात पडलंय. या राज्यात कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत असून गेल्या एका आठवड्यात या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश पदुदुचेरीमध्ये १२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत प्रत्येक सातव्या व्यक्तीत कोरोना संक्रमणाला दुजोरा मिळाला आहे. ३ हजार ४५१ चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये ५१२ म्हणजेच १४.८३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेत. तर ६ एप्रिल रोजी ३ हजार ०१८ चाचण्यांमध्ये फक्त २३७ म्हणजे ७.८५ टक्के बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली.

पश्चिम बंगाल निवडणूक प्रचार ठरला चिंताजनक

पश्चिम बंगालमधील मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी बंगालमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्णवाढ झाली असून ४ हजार ५११ रुग्णांची नोंद झाली. तर मृत्यूदर १.७ झाला असून हा दर महाराष्ट्र इतकाच आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, पश्चिम बंगालमधील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १९ हजार ४०७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ४१४ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८२ हजार ४६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २६ हजार ५३१ जणांवर उपचार सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown | “ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन”

Corona | देशभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; तब्बल 1,027 कोरोना रूग्णांचा मृत्यू