in ,

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज शरद पवारांची भेट घेणार

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे तृणमूल काँग्रेसला 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. मात्र, निकालाच्या दिवशी प्रशांत किशोर यांनी आपण या निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कशासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही बोलणी होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बिग बी बोलतायत थेट कोरोना बाधित रुग्णांशी

Petrol Diesel Price | पेट्रोल डिझेलने घेतला भडका