in ,

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीश ‘वर्क फ्रॉम होम’

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयालाही याचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानं न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. न्यायालय परिसराचं निर्जुंतुकीकरण करण्यात आलं आहे.

कोरोनाचा फटका बसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही याचा परिणाम झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपीठाकडून एका तास उशिरानं सुरू होणार आहे, तर ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता सुरू होईल, अशी माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भाजपचे मुख्यमंत्री असले की कोरोना पळून जातो का?’

ठाकरे सरकार लबाड नाही तर महावसुली सरकार आहे; फडणवीसांचा हल्लाबोल