in

अदानी इलेक्ट्रिकल कंपनी बाहेर कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

गेल्या 36 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतन कराराला दिरंगाई होत असल्यामुळं अदानी इलेक्ट्रिकल संघर्ष समितीच्या माध्यमातून आज टिळक नगर इथं अदानी इलेक्ट्रिकल कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं आहे. येत्या काळात जर कंपनीनं योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत कार्य करत असताना देखील सरकारकडून रेल्वेप्रवास तर नाहीच परंतु कार्यालयाकडून पगारवाढीचा कोणताही ठोस निर्णय होत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन करार न करता नवीन कायदे व्यवस्थापन कामगारांच्या माथी मारत आहे व त्यांना नाहक त्रास देत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं. आहे. यावेळी घोषणा देखील देण्यात आल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ZEE Marathi |’देवमाणूस’ मालिका होणार बंद

केंद्र सरकारचा निषेध; महागाई विरोधात काँग्रेसकडून सायकल रॅली