in

IND vs ENG : इंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा

BIRMINGHAM, ENGLAND - JULY 31: England captain Joe Root and India captain Virat Kohli hold the series trophy at Edgbaston on July 31, 2018 in Birmingham, England. (Photo by Gareth Copley/Getty Images)

इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघांत ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

इंग्लंडने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी नव्हते. दुखापतीमुळे या दोन कसोटी सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्सचा समावेश केलेला नाही.

इंग्लंडचा संघ : जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जॅक लीच, ओली पोप, जॅक क्रॉले, जेम्स अँडरसन, डोम बेस, सॅम करन, ओली रॉबिन्सन, हसीब हमीद, डॉम सिब्ले, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉय बर्न्स, मार्क वूड.

कसोटी मालिका

पहिला सामना – ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंगहॅम
दुसरा सामना – १२ ते १६ ऑगस्ट, लंडन
तिसरा सामना – २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथा सामना – २ ते ६ सप्टेंबर, लंडन
पाचवा सामना – १० ते १४ सप्टेंबर, मँचेस्टर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापूरात रेड अलर्ट जारी

‘रावसाहेब’ चे मोशन पोस्टर रिलीज…