पुण्यातील उद्रेकीमुळे आरोग्यव्यवस्था तोकडी पडताना दिऊन येत आहे. राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्था तोकडा पडताना दिसत आहे.
सध्या रुगणांना व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तसेच एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
पुण्याच्या लष्करी रुग्णालयातील बेडस् उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, लष्कराने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. हे बेडस उपलब्ध झाले तरी त्यांची संख्या 450 इतकीच आहे. त्यामुळे पुण्यात आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.
Comments
Loading…