in

युरोप मोठ्या युध्दाच्या उंबरठ्यावर

रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून रशियाचे हजारो रणगाडे आणि क्षेपणास्त्र युक्रेनभोवती तैनात करण्यात आले आहेत. सातत्याने बिघडत असलेल्या परिस्थितीमुळे युरोपमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जर्मनीने रशियाला सैन्य मागे घेण्याचे आवाहन करुनही रशियाने आपले सैन्य मागे घेतलेले नाही. रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिकेने देखील यात उडी घेतली आहे. अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात आपल्या दोन युद्धनौका पाठवण्याची तयारी करत असून त्यामुळे एकूणच जागतिक महायुद्धासारखी परिस्थिती तयार झाली आहे.

रशियाने पूर्व डोनबासच्या वोरोनेक आणि क्रासनोडरमध्ये रणगाडे तैनात केले आहेत. क्रेमलिन प्रवक्ता दमित्री पेस्कोव म्हणाले, यूक्रेनमध्ये परिस्थिती खूप अस्थिर आहे. यामुळे युद्धाचा धोका वाढला आहे. मात्र आपण काहीही चुकीचे करत नसल्याचा दावा रशियाने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने आपले युद्ध जहाज तुर्कीच्या हद्दीतून पाठवण्यासाठी परवानगी मागितली आहे. बोसफोरसच्या मार्गे अमेरिका हे जहाज पाठवणार आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेची जहाजे 14 आणि 15 एप्रिलला तुर्कीतून जातील. नुकतेच युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. त्याला अमेरिकेने पाठिंबा दिलाय. यावर रशियाने नाराजी व्यक्त केलीय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today: सोने झाले स्वस्त, पाहा आजचे भाव

#BreakTheChain | शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत मिळणार