in

सीरमकडून लसीचे 10 काेटी डाेस विकत घेण्यास परवानगी देण्याची युराेपियन सरकारकडे विनंती

युराेपमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, फ्रान्ससह काही देशांमध्ये लाॅकडाऊन लागले आहे. त्यामुळे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून ‘ॲस्ट्राझेनेका’ने विकसित केलेल्या लसीचे १० काेटी डाेस विकत घेण्यास परवानगी देण्याची विनंती युराेपियन समुदायाने केंद्र सरकारकडे केली आहे. भारतात काेराेनाच्या लसींचे सर्वाधिक उत्पादन हाेत आहे.

त्यात ‘सीरम’ आघाडीवर आहे. मात्र, सर्वप्रथम देशाची गरज पूर्ण करणार आणि त्यानंतरच निर्यात करणार अशी भूमिका कंपनीने यापूर्वीच जाहीर केली आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांमध्ये काेराेनाच्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत युराेपमध्ये लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीसाठी युराेपियन देशांचे डाेळे भारताकडे लागले आहेत. लसविक्रीसाठी परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारवर युराेपियन समुदायाकडून दबावही वाढलेला दिसत आहे, तसेच ब्रिटनने ‘सीरम’ला १ काेटी लसींची ऑर्डर दिली हाेती.

त्यापैकी उर्वरित ५० लाख लसींचा पुरवठा करावा, यासाठी ब्रिटनकडून दबाव वाढत आहे. युराेपियन समुदायाची मागणी भारताकडून मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे भारतात ‘सीरम’तर्फे उत्पादन करण्यात येत आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या युराेपियन कारखान्यांमधून अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन हाेत आहे. त्यामुळे ‘सीरम’कडून लसीची मागणी करण्यात येत आहे. युराेपियन समुदायाच्या राजदूतांनी दाेन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारला विनंतीचे पत्र पाठविले हाेते. याबाबत ‘सीरम’, तसेच केंद्र सरकारकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मास्क न घालण्यावरून उद्धव यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन; वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं