in

Assam Elections : भाजपा उमेदवाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर पुन्हा मतदान होणार – निवडणूक आयोगाची माहिती

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन्स सापडल्याने खळबळ माजली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतील आहे. ज्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन आढळून आले होते. त्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी गुरुवारी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदान झाल्यानंतर एका खासगी गाडीत नागरिकांना ईव्हीएम मशीन सापडली. ही गाडी त्याच मतदारसंघातील भाजपा उमेदवाराची असल्याचं नंतर समोर आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले.

दरम्यान, या घटनेनंतर निवडणूक आयोगाने वास्तविक अहवाल प्रसिद्ध केला आहे. “राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक १४९ वर १ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता दुर्दैवी घटना घडली. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहनाच्या मालकाबद्दल कोणतीही चौकशी न करता ईव्हीएम आणि इतर साहित्यासह त्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसह भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र, करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येईल,” असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Deepali Chavan Suicide : “दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”

रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन बांगडी